Saturday, September 25, 2010


अब्राहम लिंकन ( १२ फेब्रुवारी १८०९ - १५ अप्रील १८६५ )

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची छबी असलेले भारत सरकारने प्रकाशीत केलेले १५ पैसे किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६५

अब्राहम लिंकन यांनी १८६१ ते १८६५ अशी ४ वर्षे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भुषविले. त्यांच्या काराकिर्दीत त्यांना अमेरिकन नागरी युद्ध, गुलामगिरीविरुद्धचा लढा अश्या देशांतर्गत व गुंतागुंतीच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. अमेरिकेच्या इतिहासातील महान राष्ट्राध्याक्षांमध्ये त्यांची गणना होते यातच त्यांच्या कार्याचा आवाका दिसुन येतो. नागरी युद्धाच्या समाप्तीनंतर ६ दिवसांतच त्यांच्यावर खूनी हल्ला करण्यात आला व त्यातच त्यांचे निधन झाले.

१९६५ साली त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारत सरकारने हे तिकीट छापले असावे असा माझा कयास आहे.


टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या -मेल ( sameercbhide@gmail.com ) संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Tuesday, September 21, 2010


जवाहरलाल नेहरु ( १४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४ )

जवाहरलाल नेहरु निधन - दुखवटा - १९६४

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची छबी असलेले १५ पैसे किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६४

पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे २७ मे १९६४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि अवघ्या देशावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर १२ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला.

वर दर्शविलेल्या टपाल तिकीटावर जवाहरलाल नेहरु यांच्या छबी सही बरोबरच पार्श्वभुमीवर मोठा जनसमुदाय आढळतो. हा जनसमुदाय त्यांच्या निधनानंतर शोकाकूल अवस्थेत जमलेल्या नागरिकांचा असावा असा कयास आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या -मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, September 18, 2010


महात्मा गांधी ( २ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८ )

भारत - दक्षीण अफ्रीका सहयोग - १९९५

महात्मा गांधींची चिरपरिचीत छबी तर सर्वांच्याच डोळ्यासमोर आहे, परंतु त्यांची तरुणपणीची छबी घेउन भारत सरकारने ’भारत - दक्षीण अफ्रीका सहयोग’ या शिर्षकाखाली छापलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९५

महात्मा गांधींनी वकिलीचे शिक्षण दक्षीण अफ्रीकेत घेतले. तेथील वर्णद्वेशाविरुद्ध त्यांनी दिलेल्या लढ्यातच त्यांच्या भारतीय राजकारणातील भावी वाटचालीची बीजे रोवली गेली.

भारत आणि दक्षीण अफ्रीका या देशांनी १९९५ साली ’विन्यान आणि तंत्रन्यान’ विषयक सहयोग देण्यासंबंधी करार केला व त्या कराराच्या गौरवार्थ भारत सरकारने २ टपाल तिकीटे छापली, त्यापैकीच हे एक.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.