Monday, October 11, 2010



जमशेदजी टाटा ( ३ मार्च १८३९ - १९ मे १९०४ )

भारतीय उद्योगविश्वाचे पितामह म्हणुन ज्यांचा उल्लेख केला जातो त्या जमशेदजी टाटांची छबी असलेले भारत सरकारने प्रकाशीत केलेले १५ पैसे किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६५

कापडाच्या गिरणीपासून आपल्या औद्योगीक काराकिर्दीची पायाभरणी करणा-या जमशेदजींनी पोलाद, शिक्षण, जलविद्युत आणि जागतिक दर्जाचे हॉटेल या प्रमुख उद्योगांच्या चतु:सुत्री वर भर दिला. त्यापैकी ’ताजमहाल’ हॉटेल चे उद्घाटन त्यांच्या हयातीत १९०३ साली करण्यात आले. पण त्यांनी बघितलेले भव्य स्वप्न आज ’टाटा स्टील’, ’आय.आय.एस.सी.’, ’टी.आय.एफ.आर.’, ’टाटा पॉवर’ च्या रुपाने प्रत्यक्षात उतरलेले आपण बघु शकतो.

प्रस्तुत टपाल तिकीटावर द्रष्ट्या जमशेदजींच्या छबीच्या पार्श्वभुमीवर त्यांच्या प्रत्यक्षात उतरलेल्या स्वप्नांना विजवाहक तारा व पोलाद उद्योगात लोखंडाचा रस ओतायला वापरली जाणारी सामुग्री यांच्या चित्रांद्वारे प्रातिनिधीक स्वरुपात दाखवण्यात आले आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, October 9, 2010



मेघनाथ साहा ( ६ ऑक्टोबर १८९४ - १६ फेब्रुवारी १९५६ )

भारतीय खगोलशास्त्रन्य मेघनाथ साहा यांची छबी असलेले भारत सरकारने प्रकाशीत केलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९३

मेघनाथ साहा हे पदार्थविन्यान क्षेत्रातील एक अग्रणी संशोधक. त्यांनी शोधलेले ’साहा समीकरण’ ता-यांच्या अंतरंगातील विविध रासायनिक व भौतीक क्रियांबद्दल माहिती मिळवण्यात उपयुक्त ठरते. त्याचबरोबर त्यांनी अणु तसेच पदार्थविन्यानाच्या शाखेत अनेक विषयांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

याचबरोबर त्यांनी भारताच्या अणु कार्यक्रमाच्या पायाभरणीत मोलाची भुमिका बजावली. बंगालमधील नद्यांच्या पुराच्या समस्येवर तत्कालीन सरकारचे लक्ष वेधून घेण्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. एक वैन्यानीक हा कायम समाजापासून व समाजाच्या समस्यांपासून दूर आपल्याच विश्वात वावरतो या सर्वमान्य संकल्पनेला त्यांनी आपल्या वर्तणुकीतुन चुक सिद्ध केले.

त्यांच्या जन्मशताब्दीनिमीत्त ह्या टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले असावे असा माझा अंदाज आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Friday, October 8, 2010


जवाहरलाल नेहरू ( १४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४ )

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची छबी असलेली अनेक टपाल तिकीटे छापण्यात आली आहेत. त्यातील हे दैनंदिन वापरासाठी छापलेले २५ पैसे किंमतीचे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९७६

लहान मुलांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे चाचा नेहरू ! आजही त्यांचा जन्मदिनबालदिनम्हणून साजरा केला जातो.नेहरूंच्या राजकीय प्रवासाबद्दल माहिती नसलेला माणूस सापडणे विरळच. त्यावर लिहिण्यास घेतले तर ब्लॉग छोटा पडेल! नेहरुंनी लिहिलेल्याडिस्कवरी ऑफ इंडियानावच्या पुस्तकावर आधारीतभारत - एक खोजही दूरदर्शन वरील मालिका खुप गाजली.



टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या -मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.