द्वारकानाथ कोटणीस (१० औक्टोबर १९१० - ९ डिसेम्बर १९४२)
माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९३१९३७ साली सुरु झालेल्या दुस-या चीन-जापान युद्धात चीनच्या मदतीला भारतातून ५ डॉक्टरांचा चमू पाठवण्यात आला होता व डॉक्टर कोटणीस हे त्या चमू मधील एक.
१९३८ साला पासून त्यांनी अविरतपणे युद्धात आघाडीवार लढणार्या जवानांची शुश्रुषा केली व शेवटी अति श्रमाने त्यांच्या प्रकृति वर परीणाम झाला व१९४२ साल संपता संपता त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
आजही ते भारत-चीन मैत्रीचे एक प्रतीक म्हणून ओळखले जातात व चीन मधील Shijiazhuang, Hebei, China येथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा अजूनही त्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकार भावनेची व पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.
प्रस्तुत तिकीट त्यांच्या पन्नासाव्या पुण्यासमरणार्थ छापले असावे असा माझा कयास आहे.
टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.
No comments:
Post a Comment