Friday, August 27, 2010

लाल बहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर १९०४ - ११ जानेवारी १९६६)

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९६६

'मुर्ती लहान पण किर्ती महान' अश्या शब्दांत गौरविले जाणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची छबी असलेले १५ पैसे किमतीचे हे टपाल तिकीट.

लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होण्यापुर्वी भारताच्या रेलवेमंत्री पदावर होते. ते रेलवेमंत्री पदावर असताना १९५६ साली झालेल्या एका रेलवे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी पदाचा राजीनामा देऊ केला होता. राजकारणातील नैतिक अधिष्ठान अधोरेखीत करणारी ही घटना भारतीय आजही विसरु शकलेले नाहीत.

नेहरुंच्या निधनानंतर १९६४ साली शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले. त्यांच्या पंतप्रधान पदावरच्या लहान काराकिर्दीत त्यांना देशापुढील अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. अन्नधान्याची टंचाई तसेच पाकिस्तान बरोबरचे युद्ध ही त्यातील काही ठळक आव्हाने. त्यांनी दिलेला 'जय जवान जय किसान' हा नारा लोकप्रिय ठरला. भारताने युद्ध तर जिंकलेच शिवाय अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरलेल्या हरितक्रांतीच्या दिशेने पहिले पाउलही टाकले.

युद्ध जिंकल्यानंतर रशियातील ताश्कंद येथे युद्धबंदीच्या करारावर स्वाक्षरी केल्याच्या दुस-याच दिवशी त्यांचे निधन झाले व भारत एक सच्च्या राजकारण्याला मुकला. शास्त्रीजींच्या अकाली निधनामागे असलेले रहस्य अजुनही उलगडलेले नाही.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

जेरोम डीसूजा ( ६ ऑगस्ट १८९७ - १२ ऑगस्ट १९७७ )


जेरोम डीसूजा यांच्या जन्मशताब्दीनिमीत्त भारत सरकारने छापलेले २ रुपये किंमतीचे हे टपाल तिकीट.


माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९७

जेरोम डिसुजा हे भारतातील एक विख्यात ख्रिस्ती ’बिशप’. त्याचबरोबर एक विद्वान व लेखक म्हणुनही प्रसिद्ध. भारतीय चर्चवरील ’बिशप’ नेमणूकीत पोर्तुगलला असणा-या अधिकाराबद्दल व्हॅटीकनबरोबरच्या वाटाघाटींमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर भारतातील फ्रेंच वसाहतिंच्या शांततामय माघारीतही त्यांनी केलेल्या वाटाघाटींचा मोलाचा वाटा होता. युनोच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत भारताचे प्रतिनिधी म्हणून जेरोम डिसुझांची नियुक्ती करण्यात आली होती.


टीप : ब्लॉगवाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले, तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Thursday, August 26, 2010



महात्मा गांधी ( २ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८ )

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची छबी असलेले भारत सरकारने दैनंदिन वापरासाठी छापलेले १ रुपया किंमतीचे हे टपाल तिकीट.

माझ्या माहितीनुसार या तिकीटाचे प्रकाशन वर्ष : १९९१

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Monday, August 16, 2010

जे.आर.डी. टाटा ( २९ जुलै १९०४ - २९ नोव्हेंबर १९९३ )

’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील १५ रुपये किमतीचे जे.आर.डी. टाटा यांची छबी असलेले हे तिकीट.
जे.आर.डी. टाटा म्हणजेच जहांगीर टाटा भारतातील नागरी उड्डयन क्षेत्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी , ’टाटा एअरलाईन्स’ या भारतातील पहिल्या व्यावसायीक विमान सेवेची सुरुवात १९३२ साली करण्यात आली. १९४६ साली ह्या ’टाटा एअरलाईन्स’ चे आत्ताच्या ’इंडीयन एअरलाईन्स’ मध्ये रुपांतर करण्यात आले!

पोलाद, अभियांत्रीकी, उर्जा, रसायने या क्षेत्रातील अनेक उद्योगांमध्ये अग्रणी असलेल्या व भारताच्या आर्थीक विकासात मोलाची भुमिका बजावणा-या ’टाटा ग्रूप’ चे प्रमुख या नात्याने जे.आर.डींचे योगदान अतुलनीय आहे.
त्यांना भारत सरकारने १९५७ साली पद्मविभुषण पुरस्काराने तर १९९२ साली भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ’भारतरत्न’ ने गौरवले.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, August 7, 2010


मदर टेरेसा ( २६ ऑगस्ट १९१० - ५ सप्टेंबर १९९७ )

मदर टेरेसा यांची छ्बी असलेले ’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदिन वापराच्या टपाल तिकीट मालिकेतील हे २० रुपये किमतीचे टपाल तिकीट.

मदर टेरेसा या एक अल्बानियन वंशाच्या परंतु भारताचे नागरिकत्व पत्करलेल्या थोर समाजसेविका. गरिब, निराधार आणि अनाथांसाठी त्यांनी चालवलेल्या कार्याची महती संपुर्ण जगभर पसरली. १९७९ साली त्यांना ’नोबेल शांतता पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात आले. १९८० साली त्यांना भारत सरकारने ’भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले. त्यांनी कलकत्त्यात स्थापन केलेल्या ’मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या संस्थेच्या आजघडीला १२३ देशांमध्ये शाखा असुन मदर टेरेसांनी घालून दिलेला मानवतावादाचा वसा त्या चालवत आहेत.

२०१० साली त्यांची जन्मशताब्दी असुन अमेरिकन टपाल खाते देखील त्यांची छबी असलेले टपाल तिकीट प्रकाशीत करणार आहे.

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Tuesday, August 3, 2010


होमी जहांगीर भाभा ( ३० ऑक्टोबर १९०९ - २४ जानेवारी १९६६ )

भारताच्या आण्वीक कार्यक्रमाचे पितामह होमी जहांगीर भाभा यांची छबी असलेले हे ’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदिन वापराच्या टपाल तिकीट मालिकेतील ४ रुपये किमतीचे तिकीट.

टी.आय.एफ.आर. (टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च ) या प्रसिद्ध संस्थेचे संस्थापक असलेले होमी भाभा अणुउर्जेच्या शांततामय वापरासाठी आग्रही होते. या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले आहे. भाभांचे नाव देउन गौरवली गेलेली ’भाभा अ‍ॅटॉमीक रिसर्च सेंटर’ ही संस्था अणुउर्जेच्या क्षेत्रात भरीव योगदान देते आहे.

होमी भाभांना भारत सरकारने १९५४ साली पद्मभुषण ह्या पुरस्काराने गौरवले. अशा या महान वैन्यानीकाचा १९६६ साली एका विमान अपघातात मृत्यु झाला.

ऋणनिर्देश
हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. सेल्वाराज मणी
२. श्री. चंद्रशेखर भिडे

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Saturday, July 31, 2010


राजीव गांधी ( २० ऑगस्ट १९४४ - २१ मे १९९१ )

इंदिरा गांधींचे सुपुत्र व भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची छबी असलेले हे’भारताचे शिल्पकार’ या दैनंदिन वापराच्या टपाला तिकीट मालिकेतील ५ रुपये किमतीचे तिकीट.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर भारताच्या पंतप्रधानपदाची सुत्रे राजीव गांधींकडे गेली. राजीव गांधी भारताला लाभलेले सर्वात तरुण पंतप्रधान ! राजीव गांधी हे ’इंडीयन एअरलाईन्स’ चे एक प्रशिक्षीत ’पायलट’ होते!

त्यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. संगणक, दुरध्वनी या आता सहजसाध्य असणा-या गोष्टी लोकांच्या वापरात येण्यास राजीव गांधींची दुरदृष्टी कारणीभूत ठरली. पण त्यांची काराकिर्द ’बोफोर्स तोफ घोटाळा’ आणि श्रीलंकेत भारतीय सैन्य पाठविण्याच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरली. या धोरणाचा विरोध म्हणून २१ मे १९९१ रोजी ’श्री पेरुंबुदूर’ येथील त्यांच्या सभेत तमीळ बंडखोर संघटना ’लिट्टे’ ने संहारक मानवी बॉम्बस्फोट घडवुन आणला व राजीव गांधींची हत्या केली.
ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ
२. श्री. निशांत राज

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.