Saturday, July 31, 2010


राजीव गांधी ( २० ऑगस्ट १९४४ - २१ मे १९९१ )

इंदिरा गांधींचे सुपुत्र व भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची छबी असलेले हे’भारताचे शिल्पकार’ या दैनंदिन वापराच्या टपाला तिकीट मालिकेतील ५ रुपये किमतीचे तिकीट.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर भारताच्या पंतप्रधानपदाची सुत्रे राजीव गांधींकडे गेली. राजीव गांधी भारताला लाभलेले सर्वात तरुण पंतप्रधान ! राजीव गांधी हे ’इंडीयन एअरलाईन्स’ चे एक प्रशिक्षीत ’पायलट’ होते!

त्यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. संगणक, दुरध्वनी या आता सहजसाध्य असणा-या गोष्टी लोकांच्या वापरात येण्यास राजीव गांधींची दुरदृष्टी कारणीभूत ठरली. पण त्यांची काराकिर्द ’बोफोर्स तोफ घोटाळा’ आणि श्रीलंकेत भारतीय सैन्य पाठविण्याच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरली. या धोरणाचा विरोध म्हणून २१ मे १९९१ रोजी ’श्री पेरुंबुदूर’ येथील त्यांच्या सभेत तमीळ बंडखोर संघटना ’लिट्टे’ ने संहारक मानवी बॉम्बस्फोट घडवुन आणला व राजीव गांधींची हत्या केली.
ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ
२. श्री. निशांत राज

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

1 comment:

  1. आपला टपाल तिकिटावरील ब्लॉग हा एक उत्तम उपक्रम आहे. धन्यवाद. मी माझ्याकडील जुनी तिकिटे पाठवीन. आपला इ-मेल आय.डी. कळवावा. कळावे.
    मंगेश नाबर.

    ReplyDelete