Saturday, July 31, 2010


राजीव गांधी ( २० ऑगस्ट १९४४ - २१ मे १९९१ )

इंदिरा गांधींचे सुपुत्र व भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची छबी असलेले हे’भारताचे शिल्पकार’ या दैनंदिन वापराच्या टपाला तिकीट मालिकेतील ५ रुपये किमतीचे तिकीट.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर भारताच्या पंतप्रधानपदाची सुत्रे राजीव गांधींकडे गेली. राजीव गांधी भारताला लाभलेले सर्वात तरुण पंतप्रधान ! राजीव गांधी हे ’इंडीयन एअरलाईन्स’ चे एक प्रशिक्षीत ’पायलट’ होते!

त्यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. संगणक, दुरध्वनी या आता सहजसाध्य असणा-या गोष्टी लोकांच्या वापरात येण्यास राजीव गांधींची दुरदृष्टी कारणीभूत ठरली. पण त्यांची काराकिर्द ’बोफोर्स तोफ घोटाळा’ आणि श्रीलंकेत भारतीय सैन्य पाठविण्याच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरली. या धोरणाचा विरोध म्हणून २१ मे १९९१ रोजी ’श्री पेरुंबुदूर’ येथील त्यांच्या सभेत तमीळ बंडखोर संघटना ’लिट्टे’ ने संहारक मानवी बॉम्बस्फोट घडवुन आणला व राजीव गांधींची हत्या केली.
ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ
२. श्री. निशांत राज

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल (sameercbhide@gmail.com) वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Monday, July 26, 2010


महात्मा गांधी ( २ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८ )

महात्मा गांधींची अनेक टपाल तिकीटे भारतीय टपाल खात्याने छापली आहेत. त्यातील ’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदिन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील हे १ रुपया किमतीचे तिकीट.

महात्मा गांधींविषयी ऐकले नसेल वा माहिती नसेल असा एकही मनुष्य भारतात सापडणे शक्य नाही!महात्मा गांधींचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ’अहिंसेचे पर्व’ गांधीपर्व म्हणूनच ओळखले जाते.भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्यापुर्वी त्यांनी दक्षिण अफ्रीकेत कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढा दिला. अहिंसा हा शब्द उच्चारल्या बरोबर डोळ्यासमोर येणारे पहिले नाव म्हणजे महात्मा गांधी! त्यांनी दिलेला शांततेचा संदेश केवळ भारत देशातच नव्हे तर संपुर्ण जगात एक प्रेरणादायी विचार ठरला आहे.

टपाल तिकीटांबद्दल लिहीत असल्यामुळेच अजुन एक गोष्ट उद्धृत कराविशी वाटते. भारतीय टपाल खात्याच्या ’वेबसाईट’ वर ह्या गोष्टीचा उल्लेख आहे. गांधीजींच्या मते टपाल तिकीटे जमवण्याचा छंद हा सर्व छंदांचा राजा ! लहान लहान मुलांनी चांगली काम केली की गांधीजी त्यांना आलेल्या पत्रांवरची टपाल तिकीट मुलांना बक्षीस म्हणून द्यायचे!

अशा या थोर नेत्याची ३० जानेवारी १९४८ रोजी म्हणजेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या ५ महिन्यात नथूराम गोडसे यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेवरील ’मी नथूराम गोडसे बोलतोय’ हे मराठी रंगभुमीवरील नाटक प्रचंड वादग्रस्त व नंतर तितकेच लोकप्रिय ठरले.

Wednesday, July 21, 2010


सत्यजीत रे ( २ मे १९२१ - २३ एप्रील १९९२ )

’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील ३ रुपये किमतीचे सत्यजीत रे यांची छबी असलेले हे तिकीट.

सत्यजीत रे हे एक जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक. त्यांची पहिली कलाकृती ’पथेर पांचाली’ अजरामर ठरली. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल ३२ राष्ट्रीय सिने पुरस्कार पटकावले आहेत. १९८५ साली त्यांना प्रतिष्ठेचा ’दादासाहेब फाळके’ पुरस्कार देण्यात आला. याशिवाय त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ’भारतरत्न’ ने सुद्धा सन्मानीत करण्यात आले आहे.

ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Tuesday, July 20, 2010


पेरियार इरोड वेंकटा रामसामि ( १७ सप्टेंबर १८७९ - २४ डिसेंबर १९७३ )

’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील ५० पैसे किमतीचे हे तिकीट.

रामसामि हे दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध आणि थोर समाजसेवक म्हणून ओळखले जातात. त्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध पुकारलेला लढा, स्त्री स्वातंत्र्याचा केलेला पुरस्कार ही त्यांच्या पुरोगामीत्वाची साक्ष देणारी काही महान कार्ये. द्रविड कळघम या राजकीय पक्षाचे संस्थापक. हिंदी भाषेचे कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध. हिंदी भाषेचे शिक्षण दक्षिण भारतीयांवर लादण्यास प्रखर विरोध व हा आर्यांचा द्रविडांवर कुरघोडी करण्याचा डाव असल्याचा आरोप.

ऋणनिर्देश
हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Monday, July 19, 2010


चंद्रशेखर वेंकट रामन ( ७ नोव्हेंबर १८८८ - २१ नोव्हेंबर १९७० )

’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील हे १० रुपये किंमत असलेले तिकीट.

प्रकाशाच्या संदर्भात प्रचलीत असलेल्या ’रामन इफेक्ट’ चे संशोधक. १९३० सालचा भौतिकशास्त्राच नोबेल पुरस्कार मिळवणारे जागतिक किर्तीचे भारतीय शास्त्रन्य. प्रकाश हा लहरींचा बनलाय त्याचप्रमाणे कणांचा सुद्धा बनलाय हा महत्वाचा सिद्धांत रामन यांच्या संशोधनामुळे अधिक प्रबळ झाला. तत्कालीन ब्रिटीश सरकारने त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची पावती म्हणुन त्यांना ’सर’ ही पदवी बहाल केली. भारत सरकारने १९५४ साली भारतरत्न पारितोषीकाने त्यांचा सन्मान केला.

ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. अनंता पुरेकर
२. सौ. शिल्पा भिडे

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Friday, July 16, 2010


इंदिरा गांधी ( १९ नोव्हेंबर १९१७ - ३१ ऑक्टोबर १९८४ )

’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील हे ५ रुपये किंमत असलेले तिकीट.

स्वतंत्र भारताला लाभलेली एकमेव महिला पंतप्रधान. एकूण १५ वर्षे पंतप्रधानपदी राहिलेल्या इंदिरा गांधी जगातील सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या महिला आहेत!

जवाहरलाल नेहरुंच्या सुकन्या इंदिराजी आपल्या कणखर निर्णयक्षमतेबद्दल प्रसिद्ध होत्या. १९७१ च्या पाकिस्तान युध्दाच्या वेळी त्यांनी दाखवलेला मानसिक कणखरपणा आजही जागतिक राजकारणात कौतुकाचा विषय आहे. त्यांनी दिलेला ’गरिबी हटाओ’ चा नारा भलताच प्रसिद्ध ठरला. पण त्यांनी देशावर लादलेली ’आणीबाणी’ हा तितकाच वादाचा विषय ठरला. ऑपरेशन ’ब्ल्यू स्टार’ च्या वादग्रस्त निर्णयाचा परिपाक म्हणून ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आणि भारताच्या राजकीय इतिहासातील एक वादळी व्यक्तिमत्व अनंतात विलीन झाले.

ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Thursday, July 15, 2010


डॉ. भीमराव आंबेडकर ( १४ एप्रील १८९१ - ६ डिसेंबर १९५६ )

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची छबी असलेली अनेक टपाल तिकीटे छापण्यात आली आहेत. त्यातील हे सर्वात नवे तिकीट. ’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील २ रुपये किमतीचे हे तिकीट.


ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !
१. श्री. निशांत राज
टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

Wednesday, July 14, 2010


जवाहरलाल नेहरू ( १४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४ )

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची छबी असलेली अनेक टपाल तिकीटे छापण्यात आली आहेत. त्यातील हे सर्वात नवे तिकीट. ’राष्ट्राचे शिल्पकार’ (Nation Builders) या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील हे २५ पैसे किंमत असलेले तिकीट.

लहान मुलांचे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे चाचा नेहरू ! आजही त्यांचा जन्मदिन ’बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.नेहरूंच्या राजकीय प्रवासाबद्दल माहिती नसलेला माणूस सापडणे विरळच. त्यावर लिहिण्यास घेतले तर ब्लॉग छोटा पडेल! नेहरुंनी लिहिलेल्या ’डिस्कवरी ऑफ इंडिया’ नावच्या पुस्तकावर आधारीत ’भारत - एक खोज’ ही दूरदर्शन वरील मालिका खुप गाजली.


ऋणनिर्देश
हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ
२. श्री. चंद्रशेखर भिडे

[टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.]