Monday, July 26, 2010
महात्मा गांधी ( २ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८ )
महात्मा गांधींची अनेक टपाल तिकीटे भारतीय टपाल खात्याने छापली आहेत. त्यातील ’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदिन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील हे १ रुपया किमतीचे तिकीट.
महात्मा गांधींविषयी ऐकले नसेल वा माहिती नसेल असा एकही मनुष्य भारतात सापडणे शक्य नाही!महात्मा गांधींचे पुर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ’अहिंसेचे पर्व’ गांधीपर्व म्हणूनच ओळखले जाते.भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्यापुर्वी त्यांनी दक्षिण अफ्रीकेत कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढा दिला. अहिंसा हा शब्द उच्चारल्या बरोबर डोळ्यासमोर येणारे पहिले नाव म्हणजे महात्मा गांधी! त्यांनी दिलेला शांततेचा संदेश केवळ भारत देशातच नव्हे तर संपुर्ण जगात एक प्रेरणादायी विचार ठरला आहे.
टपाल तिकीटांबद्दल लिहीत असल्यामुळेच अजुन एक गोष्ट उद्धृत कराविशी वाटते. भारतीय टपाल खात्याच्या ’वेबसाईट’ वर ह्या गोष्टीचा उल्लेख आहे. गांधीजींच्या मते टपाल तिकीटे जमवण्याचा छंद हा सर्व छंदांचा राजा ! लहान लहान मुलांनी चांगली काम केली की गांधीजी त्यांना आलेल्या पत्रांवरची टपाल तिकीट मुलांना बक्षीस म्हणून द्यायचे!
अशा या थोर नेत्याची ३० जानेवारी १९४८ रोजी म्हणजेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या ५ महिन्यात नथूराम गोडसे यांनी गोळ्या घालून हत्या केली. या घटनेवरील ’मी नथूराम गोडसे बोलतोय’ हे मराठी रंगभुमीवरील नाटक प्रचंड वादग्रस्त व नंतर तितकेच लोकप्रिय ठरले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment