Friday, July 16, 2010


इंदिरा गांधी ( १९ नोव्हेंबर १९१७ - ३१ ऑक्टोबर १९८४ )

’राष्ट्राचे शिल्पकार’ या दैनंदीन वापरासाठी छापलेल्या टपाल तिकीट मालिकेतील हे ५ रुपये किंमत असलेले तिकीट.

स्वतंत्र भारताला लाभलेली एकमेव महिला पंतप्रधान. एकूण १५ वर्षे पंतप्रधानपदी राहिलेल्या इंदिरा गांधी जगातील सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या महिला आहेत!

जवाहरलाल नेहरुंच्या सुकन्या इंदिराजी आपल्या कणखर निर्णयक्षमतेबद्दल प्रसिद्ध होत्या. १९७१ च्या पाकिस्तान युध्दाच्या वेळी त्यांनी दाखवलेला मानसिक कणखरपणा आजही जागतिक राजकारणात कौतुकाचा विषय आहे. त्यांनी दिलेला ’गरिबी हटाओ’ चा नारा भलताच प्रसिद्ध ठरला. पण त्यांनी देशावर लादलेली ’आणीबाणी’ हा तितकाच वादाचा विषय ठरला. ऑपरेशन ’ब्ल्यू स्टार’ च्या वादग्रस्त निर्णयाचा परिपाक म्हणून ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आणि भारताच्या राजकीय इतिहासातील एक वादळी व्यक्तिमत्व अनंतात विलीन झाले.

ऋणनिर्देश

हे तिकीट माझ्या संग्रही ठेवण्यास दिल्याबद्दल आभार !

१. श्री. यशवंत महाबळ

टीप : ब्लॉग वाचकांस त्यांच्याकडील एखादे टपाल तिकीट माझ्या संग्रहास द्यावेसे वाटले तर माझ्या ई-मेल वर संपर्क साधा, मी आपला ऋणी राहीन.

No comments:

Post a Comment